www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळच्या अटकेनंतर काही महत्त्वाची माहिती उघड झालीय. कसाबच्या फाशीच्या बदला घेण्याचा भटकळचा इरादा होता. त्यासाठी सणांच्या काळात विविध ठिकाणी मोठे स्फोट करण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र बुद्धगयेत स्फोट अपयशी झाल्यामुळे भटकळवर आयएसआय नाराज होतं, अशी माहिती सध्या हाती आली आहे.
नाव - यासीन भटकळ
वय - ३० वर्ष
पेशा - इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक
काम - कुख्यात दहशतवादी
यासीन भटकळसोबत अटक केलेला असदुल्ला अख्तर जावेद अख्तर उर्फ हड्डी उर्फ शाकेर यालाही अटक करण्यात आलीय. असदुल्लाचाही जर्मन बेकरी स्फोटात हात होता. तेव्हापासूनच तो फरार होता. असदुल्ला मुळचा आझमगढचा रहिवासी आहे. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या दहशतवादी यासीन भटकळला नेपाळमध्ये अटक करण्यात आली. तो काल बिहार पोलिसांच्या ताब्यात होता. आज त्याला नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. भटकळसोबतच मुजाहिदीनचा आणखी एक अतिरेकी असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी यालाही अटक करण्यात आली आहे.
इंटरपोलच्या मदतीनं नेपाळ पोलीस आणि कर्नाटक पोलिसांसह N.I.Aच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. पोलिसांची ही मोठी कारवाई असल्याचं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ या भटकळ बंधूंचा यासीन हा धाकटा भाऊ आहे.
मोस्ट वॉण्डेट दहशतवादी टुंडापाठोपाठ यासीन भटकळलाही आता अटक झाली आहे. देशातल्या तपास यंत्रणांचे मनोधैर्य द्विगुणीत करणा-या या दोन घटना आहेत. मात्र अजूनही भारताचा मोस्ट वॉण्डेट दहशतवादी दाऊद इब्राहिम अजूनही देशाच्या बाहेर आहे. त्यामुळे आता दाऊद इब्राहिमला कधी अटक होणार आणि त्याला भारतात कधी आणणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय. टुंडानं दिलेल्या माहितीमुळेय यासीन हाती लागलाय. आता यासीननं तोंड उघडलं तर दाऊदबाबतही महत्तवाची माहिती मिळू शकेल अशी आशा तपास यंत्रणांना आहे.
यासीन भटकळच्या अटकेमुळं नि:श्वास टाकल्याचं वक्तव्य त्याच्या कुटुंबियांनी केलंय. यासीनच्या फेक एन्काऊंटरची आपल्याला भीती होती. मात्र त्याच्या अटकेमुळं आम्हाला दिलासा मिळाल्याचं यासीनच्या कुटुंबीयांनी सांगीतलंय. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. यासीन दोषी आढळला तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी, अशी प्रतिक्रियाही त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
नेपाळच्या सीमेवर मोस्ट वॉन्टेट दहशतवादी यासीन भटकळला अटक करण्यात आल्याने पोलिसांचं हे सर्वात मोठ यश असल्याचं मत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केलंय. तर यासिन भटकळने पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराची रेकी केली होती. त्याचबरोबर इथे स्फोट घडवण्याचा त्याचा कट फसला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.