नवी दिल्ली : नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला.
लोकसभेचं कामकाज सुरू होताच १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी ते थेट सोमवारपर्यंत तहकूब केलंय.
सर्व कामकाज बाजूला ठेवून नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा व्हावी, यासाठी काल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली.
सरकार चर्चेला तयार आहे. पण त्यावर मतदान घेण्याची सरकारची इच्छा नाही, त्यामुळेच आज पुन्हा एकदा गदारोळ झाला.
तिकडे राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांची आक्षेपार्ह्य विधानं कामाकाजातून रद्द करण्यात आली आहेत. पण आझाद यांनी माफी मागावी यासाठी पुन्हा गोंधळ झालाय.