नोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...

नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत. 

Updated: Nov 18, 2016, 01:34 PM IST
नोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...  title=

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत. 

* सरकारच्या आदेशानुसार, बँकांतून जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलण्याची सीमा ४५०० रुपयांवरून कमी करून २००० रुपयांवर करण्यात आलीय. म्हणजे तुम्ही केवळ केवळ २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकाल.   

* देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे. ज्यांना रोख रकमेची गरज आहे... त्यांनी आपलं डेबिट कार्ड पेट्रोल पंपावर स्वाईप केल्यावर पेट्रोल पंप चालक त्यांना दोन हजार रुपये देतील.

* लग्नघरातील कुटुंबीयांनाही दिलासा देण्यात आलाय. लग्नघरात अडीच लाख काढता येणार आहे. यासाठी लग्नपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. 

* शेतकरी आता क्रेडिट कार्डच्या साहाय्यानं प्रत्येक आठवड्याला २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज आणि आपल्या खात्यात जमा असलेल्या पैशांपैकी २५ हजार रुपये चेक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं काढू शकतील. म्हणजेच शेतकरी एकूण ५० हजार रुपये काढू शकतील. 

* एपीएमसी मार्केटमधील रजिस्टर्ड व्यापारी मजूर आणि इतर खर्चांसाठी बँकेतून आठवड्याला ५० हजार रूपये काढू शकतील.

* केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये आगाऊ घेता येतील. ( यात बीएसएफ, आर्मी, रेल्वे कर्मचारी तसेच विविध केंद्रीय सेवांचा समावेश आहे)
 
* याशिवाय केंद्र सरकारच्या ग्रुप सी पर्यंतचे कर्मचारी दहा हजार रुपयांपर्यंत अॅडव्हान्स पगार रोख स्वरुपात काढू शकतील. 

* गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय महामार्गांवर २४ पर्यंत टॅक्स न घेण्याच्या सूचना दिल्यात.