कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला!

कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

Updated: Jun 11, 2015, 11:06 PM IST
कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला! title=

नवी दिल्ली: कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

तसंच कोकण रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार आहे. सावंतवाडी टर्मिनलचं पुढच्या आठवड्यात उदघाटन करण्यात येणार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी असा नवा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. तसंच लांब पल्ल्याच्या रेल्वेला गर्दी असते हे लक्षात घेता कोचेसची संख्या २४ वरून २६ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी प्रभूंनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड करण्याचा प्रभूंचा विचार आहे. तसंच मुंबईतल्या रेल्वे समस्यांबाबत श्वेतपत्रिकाही तयार करण्यात आलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.