www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सकाळी ते रात्री यावर संपर्क साधून आपली तक्रार करू शकणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे हे सरकारी स्टींग ऑपरेशन असेल, असे म्हटले जात आहे.
दिल्लीत आम आदमी पार्टीने प्रचाराच्यावेळी आम्ही सत्तेत आलो तर सरकारी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पावले उचलली जातील, असे स्पष्ट केलं होतं. त्यासाठी आम्ही एक हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यानुसार हेल्पलाईन नंबर - ०११- २७३५७१६९ सुरू केला आहे. हा क्रमांक सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावर दिल्लीतील प्रत्येक नागरिक तक्रार करू शकेल. याची दखल मुख्यमंत्री केजरीवाल स्वत: घेणार आहेत.
नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन भ्रष्टाचार संपविण्यासाठी मदतीसाठी पोलीस घेणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केलेय. प्रत्येक व्यक्त लाचलुचपत पोलीस इन्स्पेक्टर असेल, असेही ते सांगायला विसरले नाहीत. आम्ही भ्रष्टाचार संपविण्यावर भर देणार आहोत. त्यासाठीच हा नंबर प्रसिद्ध केला आहे. आणखी काही नंबही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तक्रारीबाबत अधिक माहिती मुख्यमंत्री केजरीवाल देणार आहेत.
याआधी सरकार स्थापन व्हायच्या आधी केजरीवाल यांनी विज दर निम्म्यावर आणण्याची तयारी केली. तर सर्वसामान्यांना ६०० लिटर मोफत पाणी देण्यास सुरूवात केली. तर विज कंपन्यांना इशारा देताना त्यांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आता भ्रष्टाचार तक्रारारीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.