दिल्ली गँगरेप : पाच जणांवर आरोप निश्चित

दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2013, 10:11 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्टट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.
दिल्लीतील गँगरेप प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींविरोधात आरोपांची निश्चिती करण्यात आल्याने सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे. गँगरेप आरोपींवर सामूहिक बलात्कार, हत्या, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, दरोड्यावेळी हत्या करणे, गुन्हा किंवा चोरी करताना हत्येचा प्रयत्न करणे, पुरावा नष्ट करणे आणि कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आलेत. हे सर्व आरोप न्यायालयाने निश्चित केलेत.

१६ डिसेंबरला चालत्या बसमध्ये तरूणीवर सामूहिक बलात्कार कऱण्यात आला होता. त्यानंतर देशभर या घटनेचा निषेध करण्यात आला. आता बलात्कारविरोधी कायद्यातही बदल करण्यात आलाय. त्यात आज पाचही आरोपींच्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब कऱण्यात आले.
सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी राम सिंह, अक्षय ठाकूर, मुकेश, पवन, विनय यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय याप्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन आहे.