दिल्ली गँगरेप : आरोपींना फाशी हवी – वडिलांची मागणी

दिल्लीत झालेल्या गँगरेपप्रकरणात आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 10, 2013, 12:36 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत झालेल्या गँगरेपप्रकरणात आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या आरोपींना फाशीचीच शिक्षा कोर्ट सुनावेल अशी आशा काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी व्यक्त केलीय. १६डिसेंबरच्या गँगरेप प्रकरणानंतर दिल्ली पुन्हा एकदा महिलांसाठी असुरक्षित असल्याचं समोर आलं.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट आज चार आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. मुकेश सायनी, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी या चार आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलीस चारही आरोपींना तिहार जेलमधून घेऊन कोर्टात दाखल झालेत. २फेब्रुवारीला फास्ट कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू झाली होती.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यास सात महिने लागले. या आरोपींवर चालविण्यात आलेल्या खटल्यात एकूण १३० वेळा सुनावणी आणि साक्षी-पुरावे घेण्यात आले. तर, या आरोपींवर दरोडा घातल्याबद्दल वेगळ्या कोर्टात खटला चालविण्यात आला. आता आज या आरोपींना कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.
गँगरेप प्रकरणातला मुख्य आरोपी रामसिंहनं ११ मार्चला तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर आणखी एक अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलीय.
राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणानंतर संपूर्ण देशभर जनप्रक्षोभ उसळला होता. नागरिकांच्या दबावामुळे सरकारला बलात्कार विरोधी कायद्यातही बदल करणे भाग पडले होते. या घटनेतील सर्व आरोपींवर या नव्या कायद्यांतर्गत खटला चालविण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.