केजरीवाल यांना हवेत १० दिवस, सत्तेसाठी जनतेशी संवाद

दिल्लीत आम आदमीचे सरकार येणार की नाही माहित नाही. मात्र, आपने उपराज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. आम्हाला दहा दिवसांची मुदत द्या, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 14, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत आम आदमीचे सरकार येणार की नाही माहित नाही. मात्र, आपने उपराज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. आम्हाला दहा दिवसांची मुदत द्या, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सकाळी साडेदहा वाजता उपराज्यपालांची भेट घेतली. दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं रात्री सादर केलं. आम आदमी पक्षाचे दिल्लीत २८ आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसने दिलेला पाठिंब्याचा प्रस्ताव आम आदमी पक्षाने धुडकावलाय.
केजरीवाल यांच्या नव्या भूमिकेमुळे दिल्‍लीतील सत्तेचा पेच सुटण्‍याची शक्‍यता आहे. आम आदमी पार्टीचे सरकार स्‍थापन होण्‍याची शक्‍यता बळावली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने आपच्या मागण्या फेटाळत केजरीवाल यांची भाषा अहंकाराची आहे, अशी जोरदार टीका केली. त्यामुळे आतापासूनच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसला आपचा ताप आहे की आपला काँग्रेचा हात आहे, याचीच चर्चा सुरू झालेय.
भारतीय जनता पक्षाने सरकार स्‍थापन करण्‍यास नकार दिल्‍यानंतर नायब राज्‍यपालांनी `आप`ला सत्ता स्‍थापनेसाठी चर्चा करण्‍यासाठी आमंत्रित केले होते. केजरीवाल यांनी `आप`च्‍या निर्णयाचे पत्र नायब राज्‍यपालांना सोपविले असून सरकार स्‍थापनेबाबत चर्चा करण्‍यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. यासंदर्भात जनतेसोबत चर्चा करायची आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री आम आदमी पक्षाची गाझियाबादमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचा पाठिंबा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं मनीष सिसौदिया यांनी म्हटलंय. काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आलीय.
काँग्रेसने आधीच आपला पाठिंबा असल्याचे पत्र उपराज्यपाल यांना दिलेय. याशिवाय जेडीयूच्‍या एकमात्र आमदारानेही पाठिंब्‍याचे पत्र दिले आहे. या पाठिंब्‍याच्‍या जोरावर एकूण ३७ सदस्‍यांचे संख्‍याबळ आपच्‍या पाठीशी राहील. आपचे दिल्‍लीत २८आमदार निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे ८ आमदार आहेत.

दरम्यान, आम आदमी पार्टी कंफ्युस्ड पक्ष आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोध करत फक्त काँग्रेसला मदत करण्याची पक्षाची भूमिका असल्याचा आरोप भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलाय. दिल्लीमध्ये मत मोजणी झाल्यानंतर नागपूरला पहिल्यांदाच आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.