दिल्ली क्रिकेट संघटना गैरव्यवहार प्रकरण, 'चौकशीसाठी विशेष तपास अधिकारी हवा'

दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराच्या चौकशी विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दिल्ली सरकारच्या समितीने केलेय.

Updated: Dec 29, 2015, 11:48 PM IST
दिल्ली क्रिकेट संघटना गैरव्यवहार प्रकरण, 'चौकशीसाठी विशेष तपास अधिकारी हवा' title=

नवी दिल्ली : दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराच्या चौकशी विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दिल्ली सरकारच्या समितीने केलेय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख न्यायाधीश गोपाळ सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आणलेली सम-विषम योजना संपूर्णपणे अपयशी ठरणार असल्याचे भाकित वर्तवित सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केजरीवाल यांना ‘तुघलक‘ म्हटले आहे.

केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केलाय. क्रिकेट संघात मुलाच्या निवडीसाठी ‘डीडीसीए’च्या पदाधिकाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी करण्यात आली, अशी माहिती मीडियाला केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीच्या क्रिकेट संघात मुलाची निवड करण्याच्या मोबदल्यात दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) पदाधिकाऱ्याकडून एका महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी करण्यात आली. तुमच्या मुलाची दिल्लीच्या संघात निवड करायची असेल तर रात्री माझ्याकडे या असा प्रस्ताव डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेसमोर ठेवला होता, असे केजरीवाल यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले. 

केजरीवाल यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव सांगण्यास नकार दिला. मात्र, संबंधित महिला एका ज्येष्ठ पत्रकाराची पत्नी असल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी मुलाखती दरम्यान केला. महिन्यापूर्वी डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने या महिलेला स्वत:च्या घरी येण्यास सांगितले होते, असा थेट आरोप केजरीवाल यांनी केलाय.

ज्यावेळी संघ निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर झालीत तेव्हा त्या यादीत मुलाचे नाव नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्या पत्रकाराच्या पत्नीला संबंधित पदाधिकाऱ्याने रात्री माझ्या घरी ये, तुझ्या मुलाची निवड होईल, असा मेसेज पाठवल्याचे केजरीवाल यांनी म्हटलेय. त्यामुळे नव्या आरोपामुळे दिल्लीत राजकिय वातावरण तापलेय.