www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.
आज दुपारी दिल्ली जल आयोगाची बैठक होणार होती. या बैठकीत दिल्लीकरांना मिळणाऱ्या मोफत पाण्यावर निर्णय होणार होता. अशा महत्त्वाच्या दिवशी कामावर जात येत नसल्याबद्दल केजरीवाल यांनी खेद व्यक्त केलाय.
‘सध्या १०२ अंश डिग्री सेल्सिअस तापानं फणफणतोय... तसंच लूज मोशनही सुरू आहेत... त्यामुळे माझं ऑफिसला जाणं कठिण आहे’ असं त्यांनी ट्विट केलंय. सोबतंच ‘देवानं, मला चुकीच्या वेळी आजारी पाडलं’ असंही त्यांनी म्हटलंय. केजरीवाल यांच्या आजारपणामुळे दिल्लीच्या मोफत पाणी पुरवठ्यावर घेण्यात येणारा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाचा आजचा तीसरा दिवस आहे. दिल्लीला ७०० लीटर मोफत पाणी देण्यासंबंधी आज सायंकाळी ४ वाजता दिल्ली जल बोर्डाची बैठक आयोजित केली गेलीय. परंतु, केजरीवाल उपस्थित नसल्यानं ही बैठकदेखील पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.