चेन्नई : चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे.
काय आहे मेसेज -
मित्रांनो चेन्नईमध्ये हाय अलर्ट आहे!!! नासाने भारताला इशारा दिला की चेन्नईमध्ये चक्रीवादळासह खूप जोरदार आणि प्रचंड पाऊस होणार आहे !!! नासाने दोन तारखा दिल्या आहेत. २१,२२ हे दोन दिवस भारताच्या आणि तामिळनाडूच्या इतिहास झाला नाही इतका पाऊस पडणार आहे.... हा पाऊस थोडा थोडका नाही... तर २५० सेंटीमीटर एकट्या चेन्नईमध्ये पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एनडीआरएफचे ३००० जवान तैनात केले आहे. तसेच सीमा सुरक्षा दल, हवाई दल यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे.... !!! नासाचं भाकीत कधी चुकत नाही.... ! पाहा सीएन आयबीएन ते लाइव्ह टेलिकास्ट करीत आहेत.... !!!
या संदर्भात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चेन्नईमध्ये हलक्या सरी पडण्याच्या शक्यता आहे. तसेच अशा प्रकारे आयबीएनने कोणतेही वृत्त दिलेले नाही. व्हॉट्सअॅपवर चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. यापूर्वीही भारतात भूकंप होणार असल्याची बातमी व्हॉट्सअॅपवर नासाच्या हवाल्याने दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.