मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याने अंदमानला बदली

 बातमी दाखवण्याची शिक्षा काहीही असू शकते, बातमीदारावर राजकारणी कोणत्याही पद्धतीने संताप व्यक्त करू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Updated: Jan 31, 2015, 07:20 PM IST
मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याने अंदमानला बदली title=

नवी दिल्ली :  बातमी दाखवण्याची शिक्षा काहीही असू शकते, बातमीदारावर राजकारणी कोणत्याही पद्धतीने संताप व्यक्त करू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

दूरदर्शनच्या म्हणजे डीडीच्या सहाय्यक दिग्दर्शकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांची बातमी दाखवल्याने, त्या दिग्दर्शकाची थेट अहमदाबादहून अंदमानला बदली करण्यात आली आहे.

निवृत्तीला आलेल्या ५८ वर्षीय व्ही एम वनोल यांना ही बदलीची शिक्षा देण्यात आली आहे.  मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. त्याबाबतची बातमी अहमदाबादेतील डीडी गिरनार चॅनेलने एक जानेवारीला प्रसारित केली. 

माहिती अधिकारांतर्गत जसोदाबेन यांना देण्यात आलेली सुरक्षा ही पंतप्रधानांची पत्नी या नात्याने दिली होती का? जर तसं असेल तर आणखी कोणत्या सुविधा आपल्याला मिळू शकतात? अशी विचारणा जसोदाबेन यांनी केली होती.
 
जशोदाबने यांच्या अर्जाबाबत माहिती देण्यास प्रशासनाने नकार दिला. यानंतर जशोदाबेन यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याविरोधात अपिल केलं.
 
ही बातमी देशभरातील सर्व न्यूज चॅनेल्सने प्रसारीत केली, त्यामुळे अहमदाबादमधील  दूरदर्शन अधिकाऱ्यांनीही ही बातमी डीडी गिरनार वाहिनीवरून प्रसारित केली.
 
मात्र या बातमीची माहिती प्रसारण मंत्रालयाकडून याची दखल घेतली आणि ही बातमी प्रसारित केल्याने, त्या बातमीपत्राची जबाबादारी असलेले व्ही एम वनोल यांना धारेवर धरण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांना थेट अंदमान धाडण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.