'दाऊदसमोर झाली मोदी-शरीफ भेट'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीमुळे बऱ्याच चर्चा झाल्या. पण मोदींच्या या पाकिस्तान भेटीबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Updated: Feb 6, 2016, 09:20 PM IST
'दाऊदसमोर झाली मोदी-शरीफ भेट' title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीमुळे बऱ्याच चर्चा झाल्या. पण मोदींच्या या पाकिस्तान भेटीबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

नरेंद्र मोदींनी जेव्हा पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली तेव्हा तिथे दाऊद इब्राहिमही उपस्थित होता, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे.

मोदी आणि शरीफ यांची ही भेट दाऊदसमोरच झाली, याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, फक्त मोदींनी या भेटीचा इन्कार करावा, मग मी पुरावे देईन असंही आझम खान म्हणाले आहेत.
खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्य करण्याची आझम खान यांची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी असेच वाद ओढवून घेतले होते. 

पॅरिसमध्ये झालेला दहशतवादी हल्ला ही अरब देशांमध्ये निष्पापांचे बळी घेतल्यामुळे आलेली प्रतिक्रिया आहे, असं बेताल वक्तव्य आझम खान यांनी केलं होतं. तर कारगीलमधलं युद्ध मुस्लिम जवानांमुळे जिंकता आल्याची मुक्ताफळंही त्यांनी उधळली होती.