'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. 

Updated: May 11, 2015, 04:26 PM IST
'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह title=

नवी दिल्ली: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. 

आज लोकसभेत बोलतांना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'दाऊद पाकिस्तानात असल्याची गुप्त माहिती आम्हाला आहे. दाऊदला भारतात आणणारच. इंटरपोलनं याआधीच दाऊदविरोधान रेड कॉर्नर नोटीस प्रसारित केली आहे.'  

त्यांनी पुढे गृहमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं की, 'दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे आम्ही वेळोवेळी पाकिस्तानला दिले आहेत. मात्र तरिसुद्धा पाकिस्ताननं भारताला कोणतीही मदत केली नाही. पाकिस्तानवर दबाव टाकून आम्ही दाऊदला भारता आणणारच.'

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना दाऊद प्रकरणी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. त्यावेळी सोमवारी यावर सविस्तर उत्तर देण्याचं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.