व्हिडिओ : मुलीला मोबाईल बंदी, आईने झोडपले शाळेच्या डायरेक्टरला

आपल्या मुलीला शाळेत मोबाईल फोन घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे संतापलेल्या आईने चक्क शाळेच्या डायरेक्टर असलेल्या महिलेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालंदरमध्ये घडली आहे. 

Updated: Apr 24, 2015, 12:10 PM IST
व्हिडिओ : मुलीला मोबाईल बंदी, आईने झोडपले शाळेच्या डायरेक्टरला title=

जालंदर : आपल्या मुलीला शाळेत मोबाईल फोन घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे संतापलेल्या आईने चक्क शाळेच्या डायरेक्टर असलेल्या महिलेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालंदरमध्ये घडली आहे. 

या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शाळेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तरणजित कौर या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

गेल्या सोमवारी तरणजित कौर हुंडल या वकिलांच्या पत्नीने जालंदरच्या मेअर वर्ल्ड स्कूल येथे हा धिंगाणा घातला. त्यांननी शाळेच्या डायरेक्टर ज्योती नगराणी यांना बंद खोलीत मारहाण केली. 

या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज शाळेने पोलिसांकडे दिले असून पोलिसांनी तो पुरावा म्हणून दाखल करून घेतला आहे. 

पाहा हा शॉकिंग व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.