अबब! लोकसंगीताच्या कार्यक्रमात साडेचार कोटींची उधळपट्टी

गुजरातच्या जामनगरमध्ये प्रसिद्ध गायक कीर्तीदान गढवी यांच्या भजन कार्यक्रमात पैशांचा अक्षरक्षा पाऊस पडला. इथं जमलेल्या लोकांनी एक नाही, दोन नाही तर तब्बल साडेचार कोटी रुपये या गायकावर उधळले.

Updated: Jun 1, 2015, 02:55 PM IST
अबब! लोकसंगीताच्या कार्यक्रमात साडेचार कोटींची उधळपट्टी  title=

जामनगर: गुजरातच्या जामनगरमध्ये प्रसिद्ध गायक कीर्तीदान गढवी यांच्या भजन कार्यक्रमात पैशांचा अक्षरक्षा पाऊस पडला. इथं जमलेल्या लोकांनी एक नाही, दोन नाही तर तब्बल साडेचार कोटी रुपये या गायकावर उधळले.

कार्यक्रमात पैशांची उधळण सुरु झाली ती काही थांबण्याचं नावच घेत नव्हती. गायकसुद्धा नोटांमध्ये मश्गुल झाल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावर फक्त नोटा आणि नोटाच पसरल्या होत्या.

अशाप्रकारे दौलतजादा करुन, पैशाचं ओंगळवाणं प्रदर्शन करुन काय साधलं जातं असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.