कानपूर : एका महिलेच्या बॅँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरातील विनायकपूर भागातील या महिलेची झोप उडाली आहे.
पासबुकवर लिहून आलेली रक्कम इतकी मोठी होती की, या महिलेने अनेकदा ती मोजण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ती तिला मोजता येत नव्हती. यानंतर तिने तिचे पासबुक बॅंक कर्मचाऱ्याला दाखवले असता तो देखील एवढी मोठी रक्कम पाहून चक्रावून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला तिचे बॅँक पासबुक अपडेट करण्यासाठी गेली होती. पासबुक अपडेट केल्यानंतर तिला तिच्या खात्यामध्ये साधारण ९५ हजार कोटी रुपये जमा असल्याचे दिसले.
या घटनेबद्दल सगळ्या गोष्टींची शहानिशा केली असता, प्रिंटर खराब झाल्याने या महिलेच्या पासबुकवर चुकून ९५ हजार कोटी जमा झाल्याचे प्रिंट झाल्याचे समजले. यानंतर बॅंक कर्मचाऱ्यांनी तात्काळ खराब झालेले प्रिंटर दुरूस्त केले.
अनेकवेळा प्रिंटरमध्ये बिघाड झाल्यास अशा प्रकारची चुक होऊ शकते असे बॅंकेचे व्यवस्थापक म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.