नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांना मफलर किंवा मास्कने चेहरा झाकण्याची परवानगी नाही. रॅपिड रेल नेटवर्क अंतर्गत सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी दिल्लीच्या दोन डझन स्टेशनवर सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे.
राजेंद्र प्लेस स्टेशनवर सोमवारी दोन अज्ञान व्यक्तींनी कंट्रोल रूममध्ये घुसून सुमारे १२ लाख रूपयांची लूट केली होती. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून सीआयएसएफने आदेश जारी केले की, कोणत्याही व्यक्तीला कपडा, मफलर, ओढणी किंवा सर्जिकल मास्कने चेहरा झाकण्याची परवानगी नाही. सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्टेशनच्या बाहेर जाणारे दोघांनी आपले चेहरे झाकले होते.
केवळ गंभीर आजारी व्यक्तींना चेहरा झाकण्याची परवानगी असल्याचे सांगितले पण त्यांनाही चौकशीवेळी चेहरा उघड करून दाखवावा लागणार आहे.