नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांचा ड्रायव्हर गुरविंदर सिंगच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवण्याचा आणि सदोष मनुष्यवधाचा आरोप या ड्रायव्हवरवर ठेवण्यात आल्याचं वृत्त द मिंट या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
3 जून 2014साली गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जायला निघाले असताना मोतीबाग परिसरामध्ये समोरून येणाऱ्या गाडीनं मुंडेंच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं होतं.