नवी दिल्ली : आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरण आणि मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं लोकसभेत धिंगाणा घातला.
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वारंवार सांगूनही काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत फलक झळकावलेच, पण प्रत्यक्षात अध्यक्षांच्या खुर्चीसमोर येऊन घोषणाबाजी करत जोरदार गोंधळ घातला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे राजीनामे घ्यावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून काँग्रेसनं संसदेचं कामकाज रोखून धरलंय.
दरम्यान, संसदेचं कामकाज होत नसल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी नाराज झालेत. लोकसभेत काँग्रेस खासदारांचा गोंधळ सुरू असताना साडेबाराच्या सुमारास आडवाणी उठून बाहेर गेले. त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी सुमारे १० मिनिटं याबाबत चर्चाही केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.