काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.

Updated: Feb 2, 2014, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेरठ
काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.
या टीकेला नरेंद्र मोदी यांनी जयपूरच्या काँग्रेस संमेलनाचं उदाहरण दिलं आहे, हे उदाहरण देतांना मोदी म्हणाले, जेव्हा जयपूरमध्ये काँग्रेस संमेलन होतं, तेव्हा पहाटे उठून, राहुल गांधी आपल्या आईच्या खोलीत गेले.
तेव्हा सोनियांनी सांगितलं होतं की राजकारण विषाने भरलं आहे. यावर पुढे बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले, सत्तेत म्हणजे विषात जास्त दिवस कोणं राहिलं?, कुणी जास्त दिवस विष पचवलं?, मग सांगा कुणाच्या पोटात जास्त विष आहे?, असे सवाल मोदी यांनी मेरठच्या सभेत केले.
तसेच सत्ता जी विषारी आहे, असं सोनियांनी म्हटलं, ती सत्ता काँग्रेसकडे अधिक काळ होती, म्हणून काँग्रेस सर्वात जास्त विषारी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथे सभेत भाजपवर टीका केली, काही लोक विषाची शेती करतात, यामुळे त्यांना पुन्हा सत्तेत ठेवण्याची गरज नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.