लालबहादूर शास्त्री यांची हत्या काँग्रेसने लपवली : नीरा शास्त्री

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मत्यूचे गूढ काही केल्या उलगडत नाही तोच आता देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा वाद समोर आला आहे.

Updated: Feb 10, 2016, 10:50 AM IST
लालबहादूर शास्त्री यांची हत्या काँग्रेसने लपवली : नीरा शास्त्री title=

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मत्यूचे गूढ काही केल्या उलगडत नाही तोच आता देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा वाद समोर आला आहे. मथुरेमध्ये राहणाऱ्या त्यांच्या सून नीरा शास्त्री यांनी या वादाला तोंड फोडले आहे. लालबहादूर शास्त्री यांचे धाकटे मुलगा अशोक शास्त्री यांच्या त्या पत्नी आहेत.

नीरा यांच्या मते, त्यांचे सासरे लालबहादूर शास्त्री यांची हत्या झाली होती. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले. त्यांना दुधातून विष देऊन त्यांची हत्या केली गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. लाल बहाद्दुर शास्त्री यांनी ही सर्व हकीकत त्यांच्या चष्म्याच्या पेटीत लिहून ठेवली असून कोणत्याही सरकारला त्यावरुन पडदा उठवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'शास्त्रीजींच्या पार्थिवाचे भारतात शवविच्छेदन का करण्यात आले नाही? त्यांचे पार्थिव काळे निळे झाले होते. त्यावर चंदनाचा लेप लावून लोकांची दिशाभूल केली गेली. त्यांच्या शरीरावर दोन ठिकाणी कापण्याचे निशाणही होते. काँग्रेस सरकारने नेहमीच ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली. आमच्या कुटुंबातील लोकांनी अनेकदा हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने कधीच आम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.