नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे.
माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी संकेत दिले की मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये येऊ शकतात. पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न केला की, नितीश कुमार एनडीएमध्ये पुन्हा येऊ शकतात की, त्यावर ते बोलले की, आगे-आगे देखिए होता है क्या, राजकारणात काहीही शक्य आहे.
उत्तर प्रदेशमध्ये निकाल पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी म्हटलं होतं की, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीवर म्हटलं होतं की, नोटबंदीचा विरोध करणे हे या दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही राहिलं. त्यामुळे त्यांना पराभव स्विकारावा लागला. यावर रघुवंश प्रसाद सिंह यांनी नाराज होत नितीश कुमार हे भाजपचं समर्थन करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय जनता दल यामुळे नाराज आहे की, जदयूचे दोन वरिष्ठ नेते श्याम रजक आणि संजय सिंह यांनी होळीच्या दिवशी केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांची अनौपचारिक भेट घेतली. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत.