जयललितांची प्रकृती ठीक, वायकोंनी घेतली भेट

एमडीएमकेते संस्थापक वायको यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांची जाऊन भेट घेतली. 

Updated: Oct 8, 2016, 01:53 PM IST
जयललितांची प्रकृती ठीक, वायकोंनी घेतली भेट title=

चेन्नई : एमडीएमकेते संस्थापक वायको यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांची जाऊन भेट घेतली. 

गेल्या काही दिवसांपासून जयललिता यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जयललिता यांची प्रकृती ठीक आहे. तसेच त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वायकोंनी भेट घेतल्यानंतर दिली. तसेच त्या उपचारांनाही चांगला प्रतिसाद देत असल्याचे वायको म्हणाले. 

गेल्या अनेक दिवसांपासून जयललिता यांच्या तब्येतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.