बीजिंग: चीनी सरकारनं आपली मॅन्युफॅक्चरिंगची ताकद वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. या कॅम्पेन अंतर्गत चीनी सरकार टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. विशेष म्हणजे हे कॅम्पेन चीननं पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर लॉन्च केलं.
चीन सरकारनं सांगितलं, ‘मेड इन चायना उत्पादनांना अपग्रेड करण्यासाठी आणि हायटेक आयात व रिसर्च आणि डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देणार.’ या कॅम्पेन अंतर्गत चीननं आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग करत असलेल्या त्या कंपन्यांना टॅक्समध्ये सूट देईल, जे मशीनला अपग्रेड करणं आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात गुंतवणूक करणार.
आज जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हा ग्लोबल कार्यक्रम लॉन्च केलं. त्याचवेळी चीनी सरकारनं हा निर्णय घेतला. चीनच्या ग्वांगझू, शांघाय आणि हाँगकाँग इथल्या भारतीय दूतावासात गुंतवणूकीसंबंधीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. चीननं या कॅम्पेनचं धेय्य कंपन्यांना तांत्रिक दृष्ट्या अधिक संपन्न करणं होय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.