दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...

हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले....  जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या.  एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...

Updated: Apr 14, 2016, 07:27 PM IST
दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या... title=

चंदीगड : हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले....  जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या.  एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...

झालं असं...
रात्र झाली होती म्हणून जगवीर सिंग त्यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता. त्यांनी त्या बॉटल्स घेतल्या. पण जर आपण बघायला गेलो तर... एका बॉटलची किरकोळ किंमत ही ६० रुपये तरी ती त्यांनी १५६ रुपयाला विकली, समजा जर व्हॅट १६.५० पैसे, आणि १२ रुपये सर्विस चार्ज, ७.३९ पैसे सर्विस टॅक्स असा लावला तरी पूर्ण किंमत ही ९५ रुपये होते मग त्यांना १५६ रुपये का द्यावे लागले.

१५ हजार दंड....
त्यानंतर त्या ग्राहकांने ही केस खूप वर्षांनी 'जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे' नोंदवली. त्या हॉटेलवर १५,००० रुपये दंड सुनावण्यात आला. पण ही तक्रार हॉटेलने नाकारली, पण त्यांच्या ह्या पूर्ण कारभाराचा ठोस पुरावा हा अयशस्वी ठरला. त्यामुळे हॉटेलला ह्या गैर प्रकाराचे पैसे भरावे लागले. आणि त्या ग्राहकाला न्याय मिळाला,

तुमच्यासाठी...
त्यामुळे जर तुमच्या बाबतीत जर काही असे प्रकार घडले तर नक्कीचं तक्रार नोंदवा.. 'जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे'