दुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर

राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.

Updated: Mar 13, 2013, 11:15 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली. कृषीमंत्रालयात केंद्रीय मंत्रीगटाची बैठक पार पडली.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, पी. थॉमस उपस्थित होते. दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारनं केंद्राकडं २२०० कोटी रुपयांची मदतीची मागणी केली होती. मात्र केंद्रानं १२०७ कोटीच राज्याच्या पदरात टाकले आहेत.
राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी दिलासादायक चर्चा होऊन महत्वाचे निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बैठकीनंतर दिली. त्यामुळं दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर झालेली मदत तुर्तास तरी थोडीफार दिलासादायक ठरणार आहे. दुसरीकडे रिपाइं नेता रामदास आठवले दुष्काळाच्या मुद्यावर दिल्लीत मोर्चा काढणार आहेत.