नवी दिल्ली : भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.
केंद्राने आयात केलेली ही डाळ सप्टेंबर महिन्यात पोहोचणे अपेक्षित आहे, मात्र ही डाळ बाजारात येईपर्यंत ऑक्टोबर उजाळणार आहे.
यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेली डाळ त्याआधीच बाजारात येणार आहेत. मूग, उडीद, मटकी, चवळी यासारख्या पिकांना दोन किंवा सव्वा दोन महिने लागतात, साधारणत: 60 ते 70 दिवसात ही पिकं घेतली जातात. त्यामुळे जास्तच जास्त 10 ऑगस्टपर्यंत ही पिके शेतकऱ्यांच्या हाती येणार आहेत.
तूर या पिकाला आणखी एक महिना जास्त लागतो, पण मूग, उडीद, मटकी, चवळी ही डाळ पिके, दोन महिन्याच्या आत येतात. सध्या बाजारात डाळीचा तुटवडा आहे, दक्षिण भारतात ही डाळं पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, तसेच याआधीच त्यांची पेरणी देखिल होते.
यामुळे सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने आयात केलेली डाळ आणि शेतकऱ्यांनी पिकवलेली डाळ एकाच वेळी बाजारात येण्याची शक्यता वाढलीय.
जर शेतकऱ्यांनी पिकवलेली डाळ पिके बाजारात सर्वात आधी आली, तर शेतकऱ्यांची डाळ शिजेल, आणि आयात केलेली डाळ आणि देशात पिकलेली डाळ एकाच वेळी बाजारात आली, तर डाळीचे भाव एवढे कमी होतील, की शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नाही, असं झालं तर मात्र मोदी सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.