नवी दिल्ली : केंद्र सरकारने दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला ३१०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. ही केंद्राने दिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी मदत असल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्राची ही मदत, उशीरा आणि तुटपुंजी आहे, केंद्राने राज्याच्या तोंडाला पानं पुसली असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राने आतापर्यंत दिलेली मदत
छत्तीसगड ९२५ कोटी
ओरिसा ३८० कोटी
कर्नाटक १५०० कोटी
तामिळनाडू ९०० कोटी