नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिलीय.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2 टक्के महागाई भत्ता वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सातव्या वेतना आयोगानं केलेली या शिफारसीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटनं मंजुरी दिलीय.
महागाईत झालेली वाढ लक्षात घेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांना डिअरनेस अलावन्स आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डिअरनेस रिलीफमध्ये 2 टक्के वाढ करण्यात आलीय. ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होईल.
याचा जवळपास 48 लाख 85 हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 55 लाख 51 हजार निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने १ जानेवारीपासून महागाई भत्त्यात २ टक्के वाढीसाठी संमती दर्शवली होती. देशातील मूलभूत वस्तू आणि सेवा यांच्या वाढत्या किमतींच्या हिशोबात महागाई भत्ता ठरतो. वर्षातल्या १२ महिन्यांच्या महागाई दराच्या सरासरीनुसार महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ वेतनावर ही वाढ मिळते.