सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसईचा १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसईचा १०वीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

Updated: May 24, 2016, 08:40 PM IST
सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर title=

नवी दिल्ली : सीबीएसईचा १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसईचा १०वीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

सीबीएसई बोर्डाचा १०वीचा निकाल २७ मे किंवा २८ मे ला जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल बघता येणार आहे.

CBSE.nic.in किंवा cbseresults.nic.in या दोन वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार आहे.

वेबसाईटवर रिझल्ट पाहतांना जन्मतारीख आणि तुमचा बैठक क्रमांक असणं आवश्यक आहे.