केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा नाही : सीबीआय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर CBIनं छापा टाकल्याचे ट्विट केले. त्यांनी ट्वीटरवर आपलं कार्यालय सिल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर टीकाही केली. मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे, तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं CBIनं स्पष्ट केलं.

Updated: Dec 15, 2015, 03:46 PM IST
केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा नाही : सीबीआय title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर CBIनं छापा टाकल्याचे ट्विट केले. त्यांनी ट्वीटरवर आपलं कार्यालय सिल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर टीकाही केली. मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे, तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं CBIनं स्पष्ट केलं.

CNG घोटाळ्यात राजेंद्र कुमार यांची काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी केली होती. त्याच संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. मात्र या छाप्यांचं निमित्त करून केजरीवाल आणि आपचे नेते आता राजकारण करत असल्याचं दिसत आहे.

अधिक वाचा : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयकडे दाखल असलेल्या प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून, केजरीवाल यांच्याशी त्याचा काही संबंध नाही, असेही सीबीआयने म्हटले आहे. आम आदमी पक्षाने सीबीआयचा दावा फेटाळला असून, मुख्यमंत्री कार्यालयातील गोपनीय फाईली तपासण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे 'आप'ने म्हटले आहे. 

छाप्यांनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय सील केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर अशा पद्धतीने छापे टाकून ते सील केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. राजकारणात मोदी माझी वाटचाल रोखू शकत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे भ्याड कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी या छाप्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सीबीआय हा केंद्र सरकारच्या हातातील पोपट आहे, हे न्यायालयानेही म्हटले आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आली आहे. छापे टाकण्यापूर्वी केजरीवाल यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. देशात आणीबाणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.