धक्कादायक: महिलेनं नवऱ्यालाच करायला लावला मैत्रिणीवर बलात्कार

नवऱ्याला इतर महिलेसोबत 'पाहण्या'च्या इच्छेतून एका महिलेनं पतीच्या साथीनं मैत्रिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Updated: Aug 17, 2014, 05:20 PM IST
धक्कादायक: महिलेनं नवऱ्यालाच करायला लावला मैत्रिणीवर बलात्कार title=

बंगळुरु: नवऱ्याला इतर महिलेसोबत 'पाहण्या'च्या इच्छेतून एका महिलेनं पतीच्या साथीनं मैत्रिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

बंगळुरुतील चिक्कानपूरा भागात आशा जालाहल्ली आणि तिचा पती दिलीप हे दोघं राहतात. या दाम्पत्त्याला चार वर्षांची मुलगी देखील आहे. आशाला तिच्या पतीला अन्य महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना बघायची इच्छा होती. या नादात आशानं तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीलाच शिकार केलं.

आशानं तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला २७ जुलौरोजी गप्पा मारण्याच्या बहाण्यानं घरी बोलवलं. यानंतर आशानं तिच्याशी अश्लील विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. पीडित महिलेनं तिला या विषयांवर बोलण्यास नकार दिला. अखेरीस आशानं तिला दमदाटी केली आणि माझ्यापतीसोबत 'सहकार्य' कर अन्यथा तुझ्या पतीला आणि पाच वर्षांच्या मुलाला मारुन टाकीन अशी धमकी तिला दिली.

यानंतर दिलीपनं पीडित महिलेवर बलात्कार केला आणि आशा हा सर्व प्रकार बघत होती. १० ऑगस्टलाही आशानं पीडित महिलेला पुन्हा घरी आणून पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावलं. हा प्रकार असह्य झाल्यानं पीडित महिलेनं तिच्या पतीला सर्व घटना सांगितली आणि यानंतर या दाम्पत्त्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आशा आणि तिचा पती दिलीप या दोघांना अटक केली असून दोघांनाही न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.