अहमदाबाद : एस टी पूर्णा नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृत्यांचा आकडा ४० वर पोहचलाय. यात महाराष्ट्रीतल ६ जण जणांचा समावेश आहे. या अपघातात २३ जण जखमी झालेत.
गुजरात राज्यातील नवसारी बारडोली रस्त्यावर गुरुकुल सोपा गावाजवळ एस टी बस नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ४० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सहा जण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील एकाच कुटुंबातील मुबिनोद्दिन हफिजोद्दिन शेख, त्यांची पत्नी रुकय्याबी मुबिनोद्दिन शेख, आणि मुलगी परवीन सफिकोद्दिन शेख यांचा समावेश आहे. धुळे शहरातील तीन जण या अपघातात मृत्यूमुखी पडलेत. यांत प्रफुल्ल कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी यांचा समावेश आहे. तिस-या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.