बीएसएफमधून तेजबहाद्दूरला बडतर्फ केल्यानंतरची प्रतिक्रिया

तेज बहाद्दूरने काही महिन्यांपूर्वी जवानांना दिल्याजाणाऱ्या निकृष्ट जेवणाबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 20, 2017, 09:27 AM IST

नवी दिल्ली : बीएसएफचा जवान तेज बहाद्दूरला २० वर्षाच्या सेवेनंतर बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले आहे. तेज बहाद्दूरने काही महिन्यांपूर्वी जवानांना दिल्याजाणाऱ्या निकृष्ट जेवणाबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून जवान तेज बहाद्दूर्फ करण्यार यादवला बडतत आले आहे. यानंतर तेज बहाद्दूरने मीडियाला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला सत्य बोलण्याची शिक्षा झाली आहे. मात्र आपण न्याय मागण्यासाठी हायकोर्टाचे दार ठोठावणार आहोत. फक्त बीएसएफच नाही, नेव्ही, आर्मी या सर्व ठिकाणी जवानांना दिला जाणारा जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे. हे सर्व अधिकाऱ्यांच्या हातात आहे, सर्वच अधिकारी असं करतात असं नाही, तर ५० टक्के अधिकारी असं करतात, ५० टक्के चांगले अधिकारी देखील आहेत.

मी पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग बनू इच्छीत होतो, असं देखील तेज बहाद्दूर यादव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तेज बहाद्दूर यादवला बडतर्फ केल्यानंतर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, सत्य बोलण्याची ही शिक्षा आहे का?, असा सवाल देखील केला जात आहे.