सीमेवरील बंकर साफ करण्यास सुरुवात, गावांमध्ये भीतीचं वातावरण

उरी हल्ल्यानंतर लष्कराने सीमेवरील चौक्या वाढवल्या आहेत. पुढे काय होणार याबाबत कोणलाही काही माहित नाही. पंजाबमध्ये फिरोजपूर जवळील भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्कराचे जवान बीएसएफच्या पोस्ट आणि सीमाभागाची पाहणी करत आहेत. 

Updated: Sep 22, 2016, 07:46 PM IST
सीमेवरील बंकर साफ करण्यास सुरुवात, गावांमध्ये भीतीचं वातावरण title=

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर लष्कराने सीमेवरील चौक्या वाढवल्या आहेत. पुढे काय होणार याबाबत कोणलाही काही माहित नाही. पंजाबमध्ये फिरोजपूर जवळील भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्कराचे जवान बीएसएफच्या पोस्ट आणि सीमाभागाची पाहणी करत आहेत. 

बीएसएफच्या बंद पडलेले बंकर स्वच्छ आणि सुस्थितीत आणण्याचं काम सुरु झालं आहे. कारण हे बंकर वेळ पडल्यास उपयोगात आणता यावेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्कर सीमा भागातील गावांचा देखील दौरा करत आहे. सीमवरील गावांमध्ये युद्ध होण्याच्या संशयाने भीतीचं वातावरण पसरलं आहे.