मोगा : जगभरात भाऊ आणि बहिणीचं नातं हे विश्वासाचं मानलं जातं. पंजाबमधील एका गावात मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे की, २००७ मध्ये तिचा छोटा भाऊ आणि वडील जपानला गेले होते. त्यावेळेस ती एकटीच घरी होती. या मुलीच्या अत्याच्या मुलाने तिच्यावर दुष्कर्म केले आणि त्याचे फोटो काढून जर कोणाला याबाबत सांगितलं तर ते इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली होती.
मुलाने मुलीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. या दरम्यान ती गर्भवती देखील झाली. पण अमर सिंगने जपानमध्ये तिचा गर्भपात करण्याचं आश्वासन दिलं. पण आता हे प्रकरण समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.