नववधुची लग्नमंडपातच प्रसुती

भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.

Updated: Feb 23, 2014, 10:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
लग्न घटिका जवळ येत असतानाच वधुला प्रसुती वेदना झाल्या आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
हा असा घडलेल्या प्रकार पाहून आलेल्या सर्व नातेवाईक मंडळींना धक्काच बसला. उलटसुलट चर्चा झाली. त्यातच नववधू आणि नववर पक्षात वादावादी होऊन मारामारी पर्यंतचा प्रकार घडला.
मुलीकडून झालेल्या चुकीची माफी वधूपित्या वरपित्याला करत होता. पण घडलेला प्रकार हा इतका लाजिरवाणा होता की, वरपित्या वरात परत घेऊन जात होता.
शेवटी नवरदेवांनी पुढाकार घेऊन आईवडीलांची समजूत काढली. आणि सात जन्म सोबत राहण्याच दिलेल वचन नवरदेवांने पू्र्ण केले.
नववधुशी सात फेरे घेऊन नवजात बालकांचा स्वीकार केला. इतकेच नव्हे तर नवजात बालकांला स्व:ताचे नावही देण्यास नवरदेव तयार झाला.
समाजापुढे एक नवा आदर्श ठेवून नवजात बालकांला नवीन ओळख दिली. यातच आमच्या दोन्ही कुटूंबियांना आंनद झाला आहे, असे सांगून मानसिंहच्या वडीलांनी आंनद व्यक्त केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.