रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

Updated: Sep 26, 2016, 06:46 PM IST
रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका title=

नवी दिल्ली : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असं मोदी या बैठकीत म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदींनी अशी कडक भूमिका घेतली असली तरी सिंधु करार मात्र लगेच रद्द होणार नाही, असं बोललं जात आहे. करार न तोडता, पाकिस्तानला जास्तीत जास्त अडचणीत कसं आणता येईल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा उपस्थित होते.