आसाममधील भाजपच्या विजयात PKचा वाटा

दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला सपशेल लाजीरवाना पराभव पत्करावा लागला. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला आसाममध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात PKचा वाटा मोठा आहे. हा पीके पडद्यामागून सूत्र चालवत होता आणि आज तो या विजयाचा खरा हिरो आहे.

Updated: May 20, 2016, 05:56 PM IST
आसाममधील भाजपच्या विजयात PKचा वाटा title=

नवी दिल्ली : दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला सपशेल लाजीरवाना पराभव पत्करावा लागला. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला आसाममध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात PKचा वाटा मोठा आहे. हा पीके पडद्यामागून सूत्र चालवत होता आणि आज तो या विजयाचा खरा हिरो आहे.

पडद्यामागचा पीके कोण?

आसाम निवडणुकीत भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरलेय. काँग्रेसला धूळ चारत भाजपने हे चहाचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. हा ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार आहे तो पीके. 'प्रशांत किशोर'. मात्र, हा प्रशांत किशोर आहे रजत सेठी.

यामुळे यश पदरात

रजत सेठी हा २९ वर्षीय युवक हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून पदवीधर झालाय. त्याने गेल्या वर्षीपासून म्हणजेच नोव्हेंबरपासून भाजपसाठी एक कॅम्पियन सुरु केले. रजत सेठी हा प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये काम केले आहे. रजत सेठी आणि त्याच्या टीमची मेहनतीमुळे ईशान्यकडील राज्यात भाजपला निर्भळ यश मिळाले.

पीकेचे काय झालेय शिक्षण!

रजत सेठी उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील राहणारा आहे. त्याने खडकपूर येथून आयआयटी केली आहे. त्यानंतर तो हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतली. २००९मध्ये खडगपूर येथून एमटेक केले. २०१४मध्ये हार्वर्ड कॅनेडी युनिव्हर्सिटीत लोक प्रशासनची मास्टर्स पदवी मिळवलेय. रजत हा संघ परिवाराशी संबंधीत आहे.

भाजपने कसा हेरला हा चेहरा?

अमेरिकेच्या दौऱ्याच्यावेळी बीजेपी महासचिव राम माधव यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी चर्चा करताना तो इव्हेंटचे काम करत असल्याचे समजले. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रजत सेठी भाजपसाठी सक्रीय झालेत. तेव्हापासून कॅम्पियन सुरु केले. दरम्यान, प्रशांत किशोरने भाजपसाठी काम करण्याचे सोडल्यानंतर आता भाजपला रजत सेठीच्या माध्यमातून नवा चेहरा मिळालाय.

रजत सेठीविषयी थोडक्यात  

- आसामच्या भाजपाच्या विजयातील चाणक्य २९ वर्षीय आयआयटीयन रजत सेठी!

- कानपूरचा रहिवासी, हॉर्वर्ड पदवीधर

- हिलरी क्लिंटन यांचे कॅम्पेन केलेय

- सहा जणांच्या टीमने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरु केले काम

- सहामधीच चौघे IIT पदवीधर

- 'आसाम निर्माण'चा नारा, राज्यातील प्रत्येक गावाला दिली भेट

- प्रत्येक बुथवर केली तरुणांची नियुक्ती

- बांग्लादेशी घुसखोरी, उद्योग व कृषी विकास यावर प्रचारात भर

- रजत सेठीचे कुटुंब राम माधव यांचे निकटवर्तीय

- नितीश यांच्या बिहार विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांच्या टीमचा सदस्य होता रजत सेठी