यूपी भाजप उपाध्यक्षाकडून मायावतींची तुलना वेश्यांशी

भाजपचे उत्तर प्रदेशातील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अतिशय खालच्या स्तराचं वक्तव्य केलं आहे. बसप अध्यक्षा मायावती यांची  तुलना त्यांनी वेश्यासोबत केली आहे, यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.

Updated: Jul 20, 2016, 05:29 PM IST
यूपी भाजप उपाध्यक्षाकडून मायावतींची तुलना वेश्यांशी title=

लखनौ : भाजपचे उत्तर प्रदेशातील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अतिशय खालच्या स्तराचं वक्तव्य केलं आहे. बसप अध्यक्षा मायावती यांची  तुलना त्यांनी वेश्यासोबत केली आहे, यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजपचे दयाशंकर सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

"मायावती यांचे चारित्र्य वेश्यापेक्षाही वाईट आहे. वेश्या पैसे घेतल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत दिलेले आश्वासन पाळते. मात्र, मायावती उमेदवारी देताना पैसे घेतात, पण नंतर त्याला विसरून त्यांना अधिक पैसे देणाऱ्या दुसऱ्यालाच उमेदवारी देतात. मायावतीमुळे बसपचे अस्तित्व संपत आहे. कांशीराम यांनी बसपची स्थापना करताना जे स्वप्न पाहिले होते, ते मायावती चक्काचूर करत आहेत. उमेदवारी देण्याच्या बाबतीत वेश्यापेक्षाही वाईट वागणूक त्यांच्याकडून दिली जाते."

 मायावतींनी याविषयी बोलताना अशा प्रकारच्या वक्तव्यांतून भाजपच्या नेत्यांची मानसिकता दिसून येत असल्याचे म्हटले आहे.