जम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार होणार स्थापन

जम्मू-काश्‍मीरमधील सरकार स्थापनेचा प्रश्न अखेर होय नाही म्हणत निकालात निघाला आहे. अनेक दिवसांची बोलणी अखेर यशस्वी झालीत. त्यामुळे पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Updated: Feb 25, 2015, 10:03 AM IST
जम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार होणार स्थापन  title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील सरकार स्थापनेचा प्रश्न अखेर होय नाही म्हणत निकालात निघाला आहे. अनेक दिवसांची बोलणी अखेर यशस्वी झालीत. त्यामुळे पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील सरकार हे काही मुद्द्यांवर स्थापन झाले आहे. सामाईक मुद्द्यांवर हे सरकार आहे. त्यामुळे ते किती दिवस टीकेल, याची शाश्वती नाही. जम्मू-काश्‍मीरसंबंधीचे कलम ३७० आणि लष्करी विशेषाधिकार कायदा अशा अनेकविध बाबींवरून असलेले मतभेद मिटविण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे. 

पीडीपीच्या प्रमुख मुफ्ती मेहबूबा यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मागील आठवड्यात "पीडीपी‘चे सर्वेसर्वा मुफ्ती सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मुफ्ती सईद यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा असणार असून भाजपचे निर्मलसिंह यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असेल. किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षांत आघाडी झाली असून, आता पुन्हा मोदी-सईद यांच्या चर्चेनंतर त्यातील मुद्दे अधिकृतरीत्या उघड केले जाणार आहेत. 

पीडीपीकडे गृह आणि अर्थ विभाग तर भाजपकडे पर्यटन आणि जलसंसाधन, अभियांत्रिकी आणि नियोजन मंत्रालय असण्याची शक्यता आहे. आमची विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. किमान समान कार्यक्रमावरदेखील दोन्ही पक्ष राजी झाले आहेत. तोडगा निघाल्याने सरकार स्थापन करण्यात येत आहे, असे भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणालेत.

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सरकार स्थापन करण्याबाबत म्हणाल्या, दोन्ही पक्षांमधील मतभेद कमी झाल्याचे पाहून आनंद झाला आहे. आम्ही आमच्या कोणत्याही मागणीवर तडजोड केलेली नाही परंतु यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.