नवी दिल्ली : लालकृष्ण अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी हे भाजपसाठी आता एक समृद्ध अडगळ होत चालले आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या तिघांनाही पक्षाच्या संसदीय मंडळातून बाजूला करण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संसदीय मंडळातील सदस्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेली नाही.
पक्षाच्या मार्गदर्शक समितीमध्ये वाजपेयी, अडवाणी आणि जोशी यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांनाही मार्गदर्शक समितीमध्ये असणार आहेत.
पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरूण जेटली, सुषमा स्वराज, वैंकय्या नायडू, नितीन गडकरी, अनंतकुमार, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जगत प्रकाश नड्डा आणि रामलाल यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.