भाजप आमदाराच्या सुंदर फोटोची जोरदार चर्चा

इशान्य भारतामध्ये भाजपचं कमळ पहिल्यांदाच फुललं आहे. आसामच्या निवडणुका जिंकल्यानं भाजपची पहिल्यांदाच इशान्य भारतामध्ये सत्ता स्थापन होत आहे. 

Updated: May 23, 2016, 11:26 PM IST
भाजप आमदाराच्या सुंदर फोटोची जोरदार चर्चा  title=

मुंबई : इशान्य भारतामध्ये भाजपचं कमळ पहिल्यांदाच फुललं आहे. आसामच्या निवडणुका जिंकल्यानं भाजपची पहिल्यांदाच इशान्य भारतामध्ये सत्ता स्थापन होत आहे. भाजपच्या या विजयाची सध्या जेवढी चर्चा सुरु आहे, त्यापेक्षा जास्त आसाममध्ये निवडून आलेल्या भाजपच्या महिला आमदाराबाबत जास्त बोललं जात आहे. 

सोशल नेटवर्किंग साईटवर भाजप आमदार अंगुरलता यांचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. अंगुरलता यांनी काँग्रेसचे सलग तीन टर्म निवडून येणारे आमदार गौतम बोरा यांचा पराभव केला. 

डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अंगुरलता यांनी बंगाली आणि आसामी चित्रपटामध्येही काम केलं आहे.