"महिलांनो! जीन्स घालू नका. लग्नापूर्वी मोबाइल वापरू नका"

महिलांना लग्नापूर्वी मोबाइल देऊ नये. तसंच, महिलांनी जीन्स पँट घालू नये, असंही शर्मा म्हणाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 10, 2013, 05:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रतलाम
मध्य प्रदेशमधील भाजप प्रदेश उपाध्ययक्ष तसंच खासदार असणाऱ्या रघुनंदन शर्मांनी वादग्रस्त विधान करून महिला समाजाचा रोष ओढावून घेतला आहे. रतलाम येथे त्यांनी विधान केलं, की महिलांना लग्नापूर्वी मोबाइल देऊ नये. तसंच, महिलांनी जीन्स पँट घालू नये, असंही शर्मा म्हणाले.
पाश्चात्य संस्कृती भारताला हानीकारक आहे, हे पटवून देताना शर्मा यांनी अशी काही विधानं केली, की त्यामुळे महिला वर्गाचा रोष त्यांना ओढावून घ्यावा लागला आहे. “मुलांपेक्षा मुलीच जास्त जीन्स घालतात. ही फॅशन अत्यंत अश्लील असून यातून महिलांची फिगर दिसते. त्यामुळे अशा प्रकारच्या जीन्स घालू नयेत”, असं शर्मा म्हणाले.
त्यानंतर मोबाइल वापरण्यावरूनही मुलींना शर्मा यांनी सल्ला दिला, की लग्नाआधी मुलींनी मोबाइल वापरू नये. मोबाइल हातात आला, की मुली वाटेल त्याला कॉल करत सुटतात. त्यांना कुणाचे कॉल येतात, याची पालकांना कल्पना येत नाही. त्यामुळे मुली मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे. असं शर्मा म्हाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.