आमदारासोबत सेक्ससाठी दबाव टाकणाऱ्या महिलेला अटक

अल्पवयीन मुलीशी कथित बलात्कार प्रकरणात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजबल्लभ यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Updated: Feb 26, 2016, 05:14 PM IST
आमदारासोबत सेक्ससाठी दबाव टाकणाऱ्या महिलेला अटक  title=

पाटणा : अल्पवयीन मुलीशी कथित बलात्कार प्रकरणात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजबल्लभ यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

बिहार पोलिसांनी गुरूवारी एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेने शालेय विद्यार्थिनीला राजबल्लभ यादव यांच्याशी जबरदस्ती सेक्स करण्याचा दबाव टाकला होता. 

आरोपी महिलेचे नाव सुलेखा देवी असून तीने ६ फेब्रुवारीला आमदाराच्या राहण्याच्या जागेवर विद्यार्थीनीला घेऊन गेल्याचा आरोप आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आणखी चार जणांना अटक केली आहे. 

विद्यार्थीनीने दिलेल्या माहितीनुसार सुलेखाने आमदाराशी सेक्स करण्यासाठी दबाव टाकला. आमदाराने यासाठी सुलेखाला ३०,००० हजार रुपये दिले.  

या प्रकरणी राजद आमदार फरार आहे.