पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
जेडीयूचे महासचिव के. सी. त्यागी यांनी सोमवार मांझी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी जेडीयूने मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.
पण, मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली होती.
मांझी यांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे, पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नितीश कुमार आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यापूर्वी मांझी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.