रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी

दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही, असं विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलं आहे. दारु पिणं चुकीचं असलं तरी ती औषधासारखी घेणं उचीत ठरेल असंही त्यांनी म्हटलंय.

Updated: Sep 8, 2014, 11:07 AM IST
रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी title=

पाटणा: दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही, असं विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलं आहे. दारु पिणं चुकीचं असलं तरी ती औषधासारखी घेणं उचीत ठरेल असंही त्यांनी म्हटलंय.

नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानं बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले जितनराम मांझी हे कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळंच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचं समर्थन करणाऱ्या मांझी यांनी आता थेट दारुचं समर्थन केल्यानं वाद निर्माण झाला आहे. 

दलितांसाठी आयोजित एक कार्यक्रमात मुख्यमंत्री मांझी म्हणाले, दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या दलितांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी त्यांनी दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यायला पाहिजे.  दलित दारू सोडू शकत नसतील तर त्यांनी ती औषधाप्रमाणे घ्यावी असा अजब सल्लाही त्यांनी दिला. 

अथक तपश्चर्येनंतर देवानं माझ्यावर कृपादृष्टी दाखवली आणि नितीशकुमार यांचं डोकं फिरल्यानं माझी मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली, असं मांझी यांनी सांगितलं. भाजपनं मांझींच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आधी भ्रष्टाचार आता दारु, राज्याचे मुख्यमंत्री अशा गोष्टींचं समर्थन करत असतील तर ती दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.