पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीण मांझी याचं नाव सेक्स स्कँडलमध्ये आलंय. यानंतर राजकारणात एकच गहजब उडालाय. भाजपनं या मुद्द्यावर तात्काळ मुख्यमंत्री मांझी यांच्याकडे नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मागणी केलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मांझी आणि बिहारी मिलिटरी पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल साध्या कपड्यांत मंगळवारी सायंकाळी बोधगयात पोहचले होते. तिथून हे दोघे एका हॉटेलात गेले. प्रवीणनं हॉटेलमध्ये लग्जरी रुमची मागणी केली जी पूर्ण करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण मांझीची ही काही असं करण्याची पहिलीच वेळ नव्हती. तो अनेक महिलांसोबत या हॉटेलमध्ये अनेकदा येताना आढळतो. मंगळवारी, हॉटेल स्टाफनं प्रवीण आणि महिला कॉन्स्टेबलला या रुमला बाहेरून कडी घालत बंद करून टाकलं. त्यानंतर, हे सगळं प्रकरण बाहेर आलं.
प्रवीणला याआधीची हॉटेल बीलंही चुकवण्याचा आरोप हॉटेल प्रशासनानं केलाय. यावरून त्याची हॉटेलच्या स्टाफशीदेखील बाचाबाची झाली होती आणि आपला त्यावेळी प्रवीणनं आपला ‘जोर’ही इथं दाखवला होता.
भाजपनं नैतिकतेच्या आधारावर गुरुवारी जीतन राम मांझी यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. प्रवीण महिला कॉन्स्टेबलसोबत चुकीचे संबंध प्रस्थापित करत होता आणि आपल्या ओळखीचा तो चुकीच्या पद्धतीनं वापर करत होता, असं भाजपचं म्हणणं आहे.
भाजपच्या म्हणण्यानुसार, हा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. बिहार भाजप महासचिव सूरज नंदन कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाच्या या गैरजबाबदार वर्तनाची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यानंतर कुणीतरी बोधगया पोलिसांना फोन करून इथं बोलावून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी इथं येऊन आपल्या खिशातून हॉटेलचं बिल भरलं. भाजपनं आरोप केलाय की, पोलिसही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.