औरंगाबाद : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये एक सीआयएसएफच्या जवानाने इतर जवानांवर गोळीबार करून त्यांना ठार केले.
सुट्टीवरून वाद झाल्यानंतर बलबीर नावाच्या जवानाने आपल्या ४ साथीदारांवर बेछूट गोळीबार केला. यात चार जवांनाचा मृत्यू झाला.
ही घटना नबीनगर पॉवर जनरेटिंग कंपनी येथे झाली. पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले गोळीबार करणारा बलबीरला अटक करण्यात आले आहे.
बलबीरने सुट्टीवर जाण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याला सुट्टी मिळाली नाही. यावरून दुसऱ्या जवांनांनी त्याची मस्करी केली. बलबीरला राग आला आणि त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने गोळीबार सुरू केला यात चार जवान जखमी झाले.
यावेळी बच्चा शर्मा आणि एन मिश्र हे दोन जवान घटनास्थळीच ठार झाले. तर दोन गंभीर झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये मृत घोषीत करण्यात आला.